शेलारांनी स्वीकारले आदित्य ठाकरेंचे आव्हान ; काय आहे नेमकं प्रकरण ?

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्या विरोधात वरळीतून निवडणूक लढवा
शेलारांनी स्वीकारले आदित्य ठाकरेंचे आव्हान ; काय आहे नेमकं प्रकरण ?

आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला आमदार आशिष शेलार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आशिष शेलार यांनी म्हटले की, आधी राजीनामा देऊन तर दाखवा मग बघु कोण जिंकतंय ?

काय आहे नेमकं प्रकरण : 

राज्यातील सत्ता बदलानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यामध्ये रोज नव्याने काहीनाकाही आरोप-प्रत्यारोप समोर येतच आहेत. अनेकदा एकमेकांना खुले आव्हान देखील दिले जात आहे. अशात आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या आव्हानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्या विरोधात वरळीतून निवडणूक लढवा, असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार निवडणुका घेण्याचे आव्हान दिले आहे. मुंबईतील चेंबूर येथील कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान दिले आहे. वरळीत माझ्यासमोर उभे राहून निवडणूक लढवा, असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

"महाराष्ट्रातील 13 खासदार आणि 40 आमदारांनी विश्वासघात केला आहे. मी त्यांना आज आव्हान देत आहे. खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येत हे मला बघायचे आहे. मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही आव्हान देतो की, मी वरळीचा राजीनामा देतो... वरळीतून तुम्ही माझ्यासमोर उभे राहा.

logo
marathi.freepressjournal.in