शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

शौचालय घोटाळ्यात मेघा सोमय्या यांचा सहभाग असल्याचा आरोप केल्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मेघा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा शिवडी कोटात ठोकला आहे. शिवडी कार्टाने याची दखल घेत सुनावणी २६ मे रोजी निश्‍चित केली आहे.

शिवसेना नेत संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असतानाच संजय राऊत यांनी किरीट सोमय्यासह त्यांच्या पत्नी मेघा यांच्यावर शौचालय प्रकरणात घोटाळ्याचा आरोप केला आहे. राऊत यांनी केवळ दहशत निर्माण व्हावी म्हणून अशाप्रकारे खोटे आरोप करून आपली बदनामी केल्याचा आरोप मेघा यांनी केला आहे. मेघा यांच्या वतीने अ‍ॅड. विवेकानंद गुप्ता, अनिल गलगली यांनी शिवडी येथील महानंर दंडाधिकारी न्यायालयात आयपीसी कलम ४९९, ५०० अंतर्गत खटला दाखल करून १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. या तक्रारीची दंडाधिकारी न्यायालयाने दखल घेत सुनावणी २६ मे रोजी निश्‍चित केली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in