पुढील वर्षांसाठी आताच शालेय वस्तूंची खरेदी

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून ८ विविध भाषांमध्ये शिक्षण दिले जातील
पुढील वर्षांसाठी आताच शालेय वस्तूंची खरेदी

मुंबई : शालेय वस्तूंचे वाटप वेळेवर होत नसल्याने दरवर्षी पालिकेच्या शिक्षण विभागावर टीकेची तोफ डागली जाते. त्यामुळे शिक्षण विभाग आतापासून कामाला लागला असून २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यासाठी शालेय वस्तू खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून २५५ कोटी २९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून ८ विविध भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये येणारे विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना २७ मोफत शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. मोफत बेस्ट बसची सुविधा, व्हच्युअल क्लास, अशा सुविधा उपलब्ध करण्यात येतात. परंतु शालेय वस्तू वाटपात दरवर्षी उशीर होतो आणि जून महिन्यात शाळा सुरु झाल्या तरी विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू वेळेवर उपलब्ध होत नाहीत. दरवर्षी होणारी टीका लक्षात घेता पुढील शैक्षणिक वर्षांसाठी आतापासून शालेय वस्तू खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी जुलै २०२३ मध्येच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

वस्तू आणि खर्च

गणवेश १३१ कोटी ८२ लाख रुपये

दप्तर ४८ कोटी ८७ लाख रुपये

वह्या ३३ कोटी ८२ लाख रुपये

छत्री व रेनकोट १५ कोटी ५८ लाख

स्टेशनरी २५ कोटी २० लाख रुपये

एकूण २५५ कोटी २९ लाख

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in