पत्राचाळ प्रकरणावरुन ईडीच्या कारवाईला वेग; दोन ठिकाणी घेतली झडती

या प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांना ‘ईडी’कडून समन्स पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली
पत्राचाळ प्रकरणावरुन ईडीच्या कारवाईला वेग;  दोन ठिकाणी घेतली झडती

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ‘ईडी’च्या कारवाईला वेग आला आहे. ‘ईडी’ने संजय राऊत यांच्या प्रकरणाशी संबंधित मुंबईतील दोन ठिकाणी छापे टाकले आहेत. ‘ईडी’कडून दोन्ही ठिकाणी झडती सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांना ‘ईडी’कडून समन्स पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली.

पत्राचाळ गैरव्यवहारातील एक कोटी सहा लाख रुपये प्रवीण राऊत यांच्यामार्फत संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. ‘ईडी’ त्याबाबत तपास करत आहे. ‘ईडी’ने संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी न्यायालयाला केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. न्यायमूर्ती एम़ जी़ देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. वैद्यकीय कारणास्तव रात्री १०.३०नंतर राऊत यांची चौकशी करणार नसल्याचे ‘ईडी’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in