धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मिस्ट मशीनने फवारणी हवेतील गुणवत्ता खालावली; पालिका अॅक्शन मोडमध्ये

पावसाने काढता पाय घेताच मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम जाणवू लागला आहे.
धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मिस्ट मशीनने फवारणी हवेतील गुणवत्ता खालावली; पालिका अॅक्शन मोडमध्ये

मुंबई : हवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी धुळीचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मिस्ट मशीनने फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई शहरातील नरिमन पॉइंट, वरळी हाजी अली परिसरात मिस्ट मशीनने फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.

पावसाने काढता पाय घेताच मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम जाणवू लागला आहे. हवेची गुणवत्ता खालावल्याने मुंबई प्रदूषित होत असून केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानंतर कठोर उपाययोजना करण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईत सुमारे सहा हजार बांधकामे सुरु असून बांधकामामुळे मुंबईची हवा प्रदूषित होत असल्याचा ठपका मुंबई महापालिकेने ठेवला आहे. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी ३५ फूट उंच भिंत सीसीटीव्ही कॅमेरे, शुटींग करणे, प्रदूषण मापन यंत्र बसवणे अशी नवी नियमावली जारी केली आहे. तसेच हवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मिस्ट मशीन फवारणी करा, असे आदेश पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी संबंधित विभागाने दिले आहेत. त्यानुसार रविवारी मुंबई शहरातील काही भागात मिस्ट मशीनने फवारणी करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

२४ वॉर्डासाठी २४ मशीन उपलब्ध

दरम्यान, धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मिस्ट मशीन घेण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. एकूण ३० मिस्ट मशीन घेण्यात येणार असून, २४ वॉर्डासाठी २४ मशीन उपलब्ध असणार आहेत. उर्वरित सहा मशीन स्टॅड बाय ठेवण्यात येणार आहेत. एखाद्या मशीनमध्ये बिघाड झाल्यास स्टँड बाय मशीनचा त्या ठिकाणी वापर करणे शक्य होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in