मंदीच्या भीतीने शेअर बाजारात पुन्हा विक्रीचा मारा;सेन्सेक्स ४९८ अंकांनी घसरला

शेअर बीएसई सेन्सेक्स ४९७.७३ अंक किंवा ०.८९ टक्का घटून ५५,२६८.४९ वर बंद झाला.
मंदीच्या भीतीने शेअर बाजारात पुन्हा विक्रीचा मारा;सेन्सेक्स ४९८ अंकांनी घसरला

भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी घसरण झाली. मंदीच्या भीतीने विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पुन्हा विक्रीचा मारा करत निधी काढून घेण्यात आल्याने आणि जागतिक बाजारातील संमिश्र वातावरणाचा बाजारावर परिणाम झाला. दोन्ही सेन्सेक्स ४९८ अंकांनी घसरला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ४९७.७३ अंक किंवा ०.८९ टक्का घटून ५५,२६८.४९ वर बंद झाला. दिवसभरात तो ५६२.७९ घसरुन ५५,२०३.४३ ची किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १४७.१५ अंक किंवा ०.८८ टक्का घसरुन १६,४८३.८५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत इन्फोसिस, ॲक्सीस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, डॉ. रेड्डीज लॅब, विप्रो, कोटक महिंद्रा बँक आणि लार्सन ॲण्ड टुब्रो यांच्या समभागात घट झाली. तर बजाज फिनसर्व, भारती एअरटेल, पॉवरग्रीड आणि बजाज फायनान्स यांच्या समभागात वाढ झाली.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक मंगळवारपासून सुरु झाली असून त्यात व्याजदरात ७५ अंकांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. तसेच मंदीच्या भीतीने जगभरातील बाजारात विक्रीचा मारा झाला, असे विनोद नायर, हेड ऑफ रिसर्च, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी म्हटले आहे. देशांतर्गत बाजार मजबूत असल्याचे सांगण्यात येत असले तरी जगभरातील बाजाराचा परिणाम अटळ आहे, असेही ते म्हणाले.

आशियाई बाजारात टोकियोमध्ये घसरण तर शांघाय, सेऊलमध्ये किंचित वाढ झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घट झाली होती. अमेरिकन बाजार सोमवारी संमिश्र वातावण होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.३८ टक्के वधारुन प्रति बॅरलचा भाव १०६.६ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी भारतीय शेअर बाजारातून ८४४.७८ कोटींच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in