तीन दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेली घसरण रोखली

तीन दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेली घसरण रोखली

गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेली घसरण गुरुवारी रोखली गेली आणि सेन्सेक्स ५०३ अंकांनी वधारला. एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेंच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे शेअर बाजारात उत्साह राहिला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ५०३.२७ अंक किंवा ०.९४ टक्का वधारुन ५४,२५२.५३ वर बंद झाला. दिवसभरात त्याने ५९६.९६ अंक किंवा १.११ टक्के वाढून ५४,३४६.२२ ची कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १४४.३५ अंक किंवा ०.९० टक्का वाढून १६,१७०.१५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, नेस्ले, विप्रो, टीसीएस आणि टेक महिंद्रा यांच्या समभागात वाढ झाली. तर सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, लार्सन ॲण्ड टुब्रो आणि डॉ. रेड्डीज यांच्या समभागात घसरण झाली.

आशियाई बाजारात शांघायमध्ये सकारात्मक तर सेऊल, टोकियोमध्ये नकारात्मक वातावरण होते. तसेच युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत वाढ झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.५४ टक्का वधारुन ११४.७ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल झाले. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी बुधवारी १,८०३.०६ कोटींच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने दिली. मासिक व्यवहार समाप्तीच्या दिनी आणि तीन दिवसांच्या घसरणीनंतर दोन्ही निर्देशांकात वाढ झाली.

दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये दोन पैशांनी घसरण होऊन ७७.५७ झाला. क्रूड दरात वाढ आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून निधी काढून घेण्यात येत असल्याचा परिणाम आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in