उद्याच्या (रविवार) मेगाब्लॉकचे अपडेट खास तुमच्यासाठी

पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेकडून मध्य, हार्बर मार्गावर २६ जून रोजी देखभाल मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे
उद्याच्या (रविवार) मेगाब्लॉकचे अपडेट खास तुमच्यासाठी
ANI

पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेकडून मध्य, हार्बर मार्गावर आज रविवार २६ जून रोजी देखभाल मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

तर हार्बर मार्गावर पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई साठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in