प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेला कॉर्पोरेट संस्थांची साथ ;मियावाकी पद्धतीने वन निर्मिती

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने साडेपाच लाख मियावाकी वनची निर्मिती केली आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेला कॉर्पोरेट संस्थांची साथ ;मियावाकी पद्धतीने वन निर्मिती
Published on

मुंबई : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने साडेपाच लाख मियावाकी वनची निर्मिती केली आहे. उद्यान विभागाच्या या उपक्रमास कॉर्पोरेट संस्थांची साथ मिळत असून, वन निर्मितीसाठी मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी बृहन्मुंबई पालिकेतर्फे गेल्या दोन वर्षांत जपानी शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी शोधलेल्या सघन वृक्ष लागवड अर्थात मियावाकी पद्धतीने पाच लाख चाळीस हजार हून अधिक देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षलागवडीने प्रेरित होऊन अनेक कॉर्पोरेट संस्थांमार्फत सामाजिक उत्तर दायित्व निधी मधून शहरी वनांची निर्मिती करण्यासाठी मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात येत आहे.

चार हजार देशी वृक्षांची लागवड

एम पूर्व विभागातील देवनार व्हिलेज रोड गोवंडी पूर्व येथील बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या श्री दत्ताराम गणपत पाटील मनोरंजन मैदानात एम एस बीलिव्ह या संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या सामाजिक उत्तर दायित्व निधी मधून इमरेल्ड संस्टेबल फाऊंडेशन या संस्थेमार्फत सुमारे चार हजार देशी वृक्षांची लागवड पूर्ण करण्यात आल्याची माहिती जितेंद्र परदेशी यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in