Sushma Andhare : 'आपला नितु आणि निलू...'; सुषमा अंधारेंनी उडवली राणे पितापुत्रांची खिल्ली!

नितेश राणे आणि निलेश राणे यांनी सुषमा अंधारेंवर टीका केल्यानंतर नाशिकच्या पत्रकार परिषदेत खिल्ली उडवली
Sushma Andhare : 'आपला नितु आणि निलू...'; सुषमा अंधारेंनी उडवली राणे पितापुत्रांची खिल्ली!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या पक्षात आल्यापासून आपल्या वक्तव्यांमुळे अनेकवेळा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी राणे पिता पुत्रांवर निशाणा साधला आहे. त्यांनी नाशिकमधील एका पत्रकार परिषदेत म्हंटले की, "आपला नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरे आहेत. वरून त्यांचा अभ्यास कमी आहे. आमच्या भावाचे म्हणजे नारायणरावांचे त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. त्यांना संस्कार देण्यात आणि वळण लावण्यात माझा भाऊ कमी पडला आहे." असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली.

भाजप नेते नितेश राणे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना म्हंटले होते की, " हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन? अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी?" या ट्विट सोबत सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडीओदेखील शेअर करण्यात आला होता. यावर उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी चांगलेच धारेवर धरले होते. पुढे त्या म्हणाल्या की, "संबंधित व्हिडीओ १० ते १५ वर्षांपूर्वीचा आहे. वादविवाद स्पर्धेचा तो व्हिडीओ असून समोरच्या म्हणण्याचे खंडन करण्याचा मी प्रयत्न करत होते. मात्र असा अर्धवट व्हिडीओ नीतू दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी समजू शकते की कणकवलीत जाऊन घेतलेला होमवर्क राणेंच्या जिव्हारी लागला आहे. त्यांची कानशिले लाल झालेली आहेत. अशा काळात त्यांचे अस्थिर होणे, नैराश्यात बोलणे मी समजू शकते." असा टोला त्यांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in