बनावट शपथपत्रप्रकरणी गुन्हे शाखेची पथके रवाना

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबद्दल तात्पुरता निर्णय जाहीर केला आहे
बनावट शपथपत्रप्रकरणी गुन्हे शाखेची पथके रवाना

उद्धव ठाकरे गटाने बनावट शपथपत्र दाखल केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केल्यानंतर त्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी बुधवारी कोल्हापूर, नाशिक, कोपरगाव येथे चौकशी केली. अनेक शिवसैनिकांची कसून चौकशी सुरू असल्याचे कोपरगावचे पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांनी दिली. गुरुवारी उर्वरित शपथपत्रांची चौकशी करून अहवाल देण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबद्दल तात्पुरता निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या महिन्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण गोठवण्यात आले आहे तसेच शिवसेना पक्षाचे नावदेखील दोन्ही गटांना पोटनिवडणुकीत वापरता येणार नाही. शिंदे गटाकडून सात लाख, तर ठाकरे गटाकडून अडीच लाख शपथपत्रे सादर करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील ४५०० बनावट शपथपत्रे आढळली आहेत. याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची टीम कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक आणि पालघरसोबतच इतर ठिकाणी पोहोचली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in