ते वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल - फडणवीस

संजय राऊत यांच्यावरील कारवाई ही पूर्णपणे पुराव्यांच्या आधारावर सुरू आहे. त्‍यांच्याबाबत न्यायालयच पुढचा निर्णय घेईल याबाबत मी...
ते वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल - फडणवीस

भाजपाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे ज्‍या शिवसेनेबाबत म्‍हणाले ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत म्‍हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्‍वातील शिवसेना आता राहिली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्‍वाखालील शिवसेनेबाबत ते म्‍हणालेले नाहीत. ही वस्‍तुस्‍थिती कृपया लक्षात घ्‍या. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नका असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले. संजय राऊत यांच्यावरील कारवाई ही पूर्णपणे पुराव्यांच्या आधारावर सुरू आहे. त्‍यांच्याबाबत न्यायालयच पुढचा निर्णय घेईल याबाबत मी काही बोलू शकत नाही असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

केंद्राच्या अनेक योजनांच्या प्रगतीच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी संयुक्‍त बैठक घेतली. काही केंद्रीय योजना चांगल्‍या सुरू आहेत; पण काहींमध्ये गेल्‍या अडीच वर्षांत काहीच काम झाले नाही. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचे काम ७६ टक्‍के पूर्ण झाले आहे, पण शहरातील केवळ १२ टक्‍केच झाले आहे. १७ लाख घरांचे लक्ष्य असताना केवळ १२ टक्‍के घरेच बांधू शकलो आहोत. केंद्राचे पैसे असूनही घरे बांधली गेली नाहीत. गरिबांचे स्‍वप्न पूर्ण झाले नाही. त्‍यासाठीच बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागांच्या समस्‍या जाणून घेतल्‍या. त्‍यावर उपाययोजना करण्यात येणार असल्‍याचेही फडणवीस म्‍हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in