अतिरिक्त आयुक्तांनी घेतला विसर्जनाच्या तयारीचा आढावा

गिरगांव चौपाटी शहर विभागातील बहुतांश सार्वजनिक मंडळांकडून गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येते.
अतिरिक्त आयुक्तांनी घेतला विसर्जनाच्या तयारीचा आढावा

लाडक्या गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेनेही योग्य ते नियोजन केले आहे. गिरगाव, दादर, माहिम, जुहू चौपाटी अशा विविध विसर्जन स्थळाची पाहणी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी केली.

गिरगांव चौपाटी शहर विभागातील बहुतांश सार्वजनिक मंडळांकडून गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येते. अनंत चतुर्दशी दिनी विविध मान्यवर, पाहुणे, राजदूत, निमंत्रित, विदेशी नागरिकदेखील याठिकाणी विसर्जन सोहळा पाहण्यासाठी येतात. त्याअनुषंगाने स्वागत व्यवस्था, विसर्जन मार्ग व विसर्जनासाठी समुद्रकिनारी केलेली व्यवस्था, पाहुण्यांसाठी उभारलेला शामियाना, निरनिराळे कक्ष, वाहनतळ नियोजन, स्वच्छता राखण्यासाठी केलेली उपाययोजना तसेच सुरक्षा व्यवस्था यांची संपूर्ण माहिती भिडे यांनी जाणून घेतली. एफ/उत्तर विभागातील शीव (सायन) तलाव या नैसर्गिक स्थळीदेखील अतिरिक्त आयुक्तांनी थेट तराफ्यावर जात पाहणी केली आणि तलावात मूर्ती विसर्जन नेमके कसे केले जाते, याचा तपशील जाणून घेतला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in