चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन यंदा लवकर होण्याचा अंदाज

चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन यंदा लवकर होण्याचा अंदाज

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन यंदा लवकर होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस २२ मेपर्यंत दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून १३ ते १९ मेदरम्यान म्हणजेच वेळेआधी दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यानंतर २० ते २६ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये तर तळ कोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, अंदमानच्या समुद्रावर १३ ते १९ मे दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये २६ मेपर्यंत व तळकोकणात २ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होईल. म्हणजेच यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार आहे.

दरम्यान, स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासात मराठवाडा आणि विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.