स्वराज एक्स्प्रेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह

स्वराज एक्स्प्रेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह

स्वराज एक्स्प्रेसमध्ये एका २० वर्षीय तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. संबंधित तरुणी स्वराज एक्स्प्रेसच्या कोचमधील वॉशरूममध्ये गेली होती. पण बराच काळ उलटूनही ती परत आली नाही. या प्रकारानंतर आसपासच्या प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी संबंधित कोचचा दरवाजा उघडला असता ही तरुणी लटकलेल्या अवस्थेत आढळली आहे.

तिच्या गळ्याभोवती एक कपडा गुंडाळलेला होता. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर रेल्वेत एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास डहाणू रोड आरएस येथे स्वराज एक्स्प्रेस रेल्वेला विशेष थांबा देण्यात आला आणि तरुणीचा मृतदेह उतरवण्यात आला, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने दिली.

Related Stories

No stories found.