लोढांचा बुलडोझर पॅटर्न ; बांगलादेशींची अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त

मालवणी परिसरातील अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी लोकांच्या घरांचे पाडकाम करण्यात आले
लोढांचा बुलडोझर पॅटर्न ; बांगलादेशींची अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त

मालाड पश्चिमेला असलेल्या मालवणी परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या बांधकामांवर कायदेशीर कारवाई करून ती पाडण्यात आली असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. जे अनधिकृत कामे करतात, त्यांच्यासाठी सरकारचा बुलडोझर पॅटर्न आहे, असा इशाराही मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे.

या संबंधित कारवाई करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी व इतर अधिकाऱ्यांसोबत पालक मंत्री लोढा यांनी एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला होता की, उपनगरातील सरकारी जमिनीवर झालेली अतिक्रमणे जमीनदोस्त केली जातील. त्यानुसार मालवणी परिसरातील अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी लोकांच्या घरांचे पाडकाम करण्यात आले आहे. ६ हजार मीटर जमीन या ठिकाणी अनधिकृत बांधकाममुक्त करण्यात आली आहे. तसेच आता याठिकाणी देशी खेळांचे मैदान तयार करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली. बांगलादेशी घुसखोरांविरोधात विशेष करून ही कारवाई होत असून, सरकारी जमिनीवर अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई होणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in