मुंबई: स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून साडेतीन वर्ष बंद असलेले नायर रुग्णालय व टो रा वैद्य महाविद्यालयाच्यावसतिगृहातील मेस सुरू करण्यात आली. त्यामुळे आता वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या अडचणी सुटणार आहेत.
कोविड काळात या नायर रुग्णालयातील युजी पीजी अभ्यासक्रमातील डॉक्टरांना जेवण पुरवणारी हाजी अली येथील मेसचे कंत्राट संपल्याने ही मेस बंद झाली. त्यातच कोविड असल्याने हे विद्यार्थी नऊ महिने आपापल्या घरी गेले. त्यामुळे मेसच्या कंत्राटाचे नूतनीकरण होऊ शकले नाही. कोविड काळ असल्याने नऊ महिन्याच्या सुट्टीनंतर आलेल्या मुलांनी आपापल्या जवळच्या नातेवाईकांकडून जेवणाची सुविधा उपलब्ध करून घेतली.त्यावेळी परीक्षेचा काळ असल्याने ही मेस सुरू करण्यासाठीचा पत्रव्यवहार विद्यार्थ्यांकडून होऊ शकला नाही.
परीक्षा संपल्यानंतर ही मेस सुरू करावी असा आग्रह विद्यार्थ्यांकडून करण्यात येऊ लागला. मात्र त्यावेळी डॉक्टर रमेश भारमल कल्पना मेहता प्रवीण राठी असे तीन अधिष्ठाता बदलले गेले त्यामुळे ही मेस सुरु होण्यास दिरंगाई झाली. त्यानंतर अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारलेल्या डॉक्टर सुधीर मेढेकर यांनी तातडीने कार्यवाही करून मेस संदर्भातील प्रक्रियेला सुरुवात केली आणि हे सर्व काम विद्यार्थ्यांवर सोपवले विद्यार्थ्यांनी देखील उत्कृष्ट दर्जाचा कंत्राटदार शोधून
संपूर्णपणे पारदर्शीत अशी निविदा प्रक्रिया राबवून, सर्व प्रकारच्या गुणवत्तेची तपासणी करून तसेच FSSAI परवाना घेऊन तब्बल साडे तीन वर्षानंतर उपाहारगृह यशस्वी रित्या सुरू करण्यात केले. त्यामुळे मुलांच्या खाण्याची परवड थांबली.
अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर तसेच माजी अधिष्ठाता डॉ. प्रविण राठी, वसतिगृह अधिक्षक डॉ. संदीप भेटे, डॉ. गिरीश राजाध्यक्ष, डॉ. संजय स्वामी, विद्यार्थी प्रतिनिधी जीशान बागवान, जीत गिंदोडिया, सिद्धी भोगांवकर यांच्या पुढाकाराने आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णपणे पारदर्शीत अशी निविदा प्रक्रिया राबवून, सर्व प्रकारच्या गुणवत्तेची तपासणी करून तसेच FSSAI परवाना असलेले उपाहारगृह यशस्वी रित्या सुरू करण्यात आले आहे.