कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाने पटकाविले

कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाने पटकाविले

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या पंच समितीने नवोदित संघाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या द्वितीय श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाने पटकाविले. तृतीय श्रेणी गटात दादोजी कोंडदेव स्पोर्ट्स विजेते ठरले. श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे द्वितीय, तर दादोजी कोंडदेव स्पोर्ट्सचा यश पाटील तृतीय श्रेणी गटात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

दिवंगत पंचांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबईतील पंचांनी या सामन्याचे आयोजन केले होते. ना. म. जोशी मार्ग श्रमिक जिमखाना येथे झालेल्या द्वितीय श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात श्रीराम मंडळाने विकास मंडळाचे कडवे आव्हान ३९-३८ असे एका गुणाने परतवून लावत स्व. सोमनाथ पुजारी चषक पटकाविला. उपविजेत्या विकासाला स्व. प्रणय मोहिते चषक प्रदान करण्यात आला.

तृतीय श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात दादोजी कोंडदेवने समर्थचा प्रतिकार ३७-२९ असा मोडून काढत स्व. रवींद्र (भाऊ) जैतपाल चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या समर्थला स्व. बुधाजी खवळे चषक देण्यात आला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in