इंधनाच्या दरात केलेली कपात म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक ; देवेंद्र फडणवीस

इंधनाच्या दरात केलेली कपात म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक ; देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारने इंधनाच्या दरांमध्ये कपात केल्यानंतर राज्य सरकारने मूल्यवर्धित करात कपात करून इंधनाच्या दरात केलेली कपात म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोलवर जवळपास नऊ रुपये, तर डिझेलवर ७.५० रुपये इतकी दरकपात करण्यात आली होती. यानंतर महाराष्ट्र सकारकडूनही इंधनाच्या दरांमध्ये कपात करण्यात आली असल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ राज्य सरकारकडून पेट्रोलवर २.८ रुपये, तर डिझेलवर १.४४ रुपये दरकपात करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. राज्य सरकारच्या या दरकपातीच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून राज्य सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार लोकांना मूर्ख बनवत असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

“महाविकास आघाडी सरकारने राणा भीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक असून महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. इंधनाची मूळ किंमत, विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस, तसेच अ‍ॅग्रिकल्चर अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस, अशा सर्व बाबींवर राज्य सरकार कर आकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला, तर राज्याचा कर आपोआप कमी होतो. त्यामुळे राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचे दर कमी केलेले नाहीत,” असे फडणवीस यांनी यात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in