सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ, सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारला

रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, पॉवरग्रीड आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या समभागात घसरण झाली.
 सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ, सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारला

जागतिक बाजारातील संमिश्र वातावरण असताना बँका, आयटी आणि वाहन कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १ टक्का वाढ झाली. सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ४४३.१९ अंक किंवा ०.८६ टक्के वधारुन ५२,२६५.७२ वर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्स ६९४.२६ अंकांनी वाढून ५२,५१६.७९ ही कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १४३.३५ अंक किंवा ०.९३ टक्का वाढून १५,५५६.६५ वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत मारुती, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, एशियन पेंट‌्स, भारती एअरटेल, टीसीएस, सन फार्मा, विप्रो, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्या समभागात वाढ झाली. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, पॉवरग्रीड आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या समभागात घसरण झाली.

आशियाई बाजारात शांघाय, टोकियोमध्ये वाढ तर सेऊलमध्ये घट झाली. युरोपियन बाजारात दुपारपर्यंत नकारात्क व्यवहार सुरु होते. अमेरिकन बाजारात बुधवारी किंचित घसरण झाली. आशियाई बाजारातील उत्साही वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार गुरुवारी सकाळी सकारात्मकतेने खुला झाला. तर मुंबई शेअर बाजारात बुधवारी सेन्सेक्स ७०९.५४ अंकांनी तर निफ्टी २२५.५० अंकांनी घसरला होता.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ७८.३२ हा नवा नीचांक नोंदवला. इंटरबँक फॉरेन एक्सचेंज बाजारात स्थानिक चलन ७८.२६ वर खुले झाले आणि ते पुन्हा ७८.३२ वर बंद झाला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in