सेन्सेक्स ३७.७८ अंकांनी घसरून ५४,२८८.६१ वर बंद

सेन्सेक्स ३७.७८ अंकांनी घसरून ५४,२८८.६१ वर बंद

महागाई कमी करण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांवर शेअर बाजाराने नकारात्मक प्रतिक्रिया दिली. दिवसभरात उच्चांकी वाढीनंतर दिवसाखेर ते घसरले.

सेन्सेक्स ३७.७८ अंकांनी घसरून ५४,२८८.६१ वर बंद झाला. तर निफ्टी ५१.४५ अंकांनी घसरून १६२१४.७० अंकांवर बंद झाला. दिवसभरात बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होते. बाजार सुरू झाल्यानंतर तो ५४,१९१.५५ अंकावर सुरू झाला. दिवसभरात तो ५४९३१.३० अंकांपर्यंत पोहोचला. दिवसाखेर बाजारात विक्रीचा दबाव होता.

महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे वाहन, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स‌ समभागांमध्ये वाढ झाली. महिंद्रा महिंद्रा, मारुती-सुझुकी, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन टुब्रो, एशियन पेंट्स‌, कोटक बँक, विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस व नेस्ले आदी कंपन्यांचे समभाग वधारले.

तर धातूंवर सरकारने आयात कर लावल्याने धातूशी संबंधित कंपन्यांचे समभाग आपटले. टाटा स्टील, स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया, जिंदाल स्टील पॉवर, जेएसडब्यू स्टील, एनडीएमसी, वेदांत व हिंदाल्को आदींचे समभाग घसरले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in