शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी घसरला

शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी घसरला

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी घसरला. मंगळवारी सेन्सेक्स ५६७.९८ अंकांनी घसरला. जागतिक बाजारातील कमकुवत परिस्थिती व परकीय वित्तसंस्थांकडून सतत शेअर्सची विक्री याचा मोठा परिणाम बाजारावर झाला आहे. आरबीआय पतधोरणात कोणता निर्णय घेते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

सेन्सेक्स ५६७.९८ अंकांनी घसरून ५५१०७.३४ वर बंद झाला. दिवसभरात तो ७९२.९१ अंकांनी घसरून ५४८८२.४१ पर्यंत घसरला होता. निफ्टी १५३.२० अंकांनी घसरून तो १६४१६.३५ वर बंद झाला.

टायटन, डॉ. रेड्डीज लॅब, लार्सन टुब्रो, एशियन पेंटस‌्, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, टीसीएस आदी कंपन्यांचे समभाग घसरले. तर एनटीपीसी, मारुती, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा आदींचे समभाग वधारले. हँगकँग, सेऊलचे बाजार घटले तर टोकियो व शांघायचे बाजार वधारले.

परकीय वित्तसंस्थांनी सोमवारी २३९७.६५ कोटींच्या समभागांची विक्री केली. मंगळवारी २०११ समभाग घसरले तर १२८६ समभाग वधारले तर १२१ समभागांचे दर स्थिर राहिले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in