मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी मुंबई येथे सुरुवात झाली. विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांत कामकाजाला वंदे मातरम् आणि राज्यगीताने सुरुवात झाली.
यावेळी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विधानसभा सदस्य उपस्थित होते. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधान परिषद सदस्य उपस्थित होते.