‘चेक माय फिज’ गाण्याचे अनावरण झाले

‘चेक माय फिज’ गाण्याचे अनावरण झाले

‘हर घूंट में स्वॅग’ मोहिमेचा विस्तार करत शीतपेय बनवणारी आघाडीची कंपनी पेप्सीने ‘चेक माय फिज’ या समर अँथम साँगचे अनावरण केले. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि रॅप गायक बादशाह यांनी या गाण्याच्या ठेक्यावर ताल धरला. तरुणाईची मस्ती आणि आनंदमय वातावरणाशी निगडित या गाण्याची रचना करण्यात आली असून मुंबईत झगमगत्या उत्साहात हे गाणे लॉन्च करण्यात आले. जॅकलिनचा नृत्यअभियन आणि बादशाहचे उत्साहवर्धक संगीत यामुळे या गाण्याला चार चाँद लागले आहेत. “सध्याची आत्मविश्वासाने जगणारी नवीन पिढी आपली मते, कपड्यांची निवड किंवा करिअरची दिशा बिनधास्तपणे निवडत असते. हेच तत्त्वज्ञान स्टायलिश पद्धतीने या गाण्याद्वारे मांडून हे गाणे संगीतक्षेत्रात झंझावात आणेल, याची मला खात्री आहे. पेप्सीचा एक भाग असल्याचा अभिमान वाटत आहे,” असे जॅकलिनने सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in