विलेपार्ले येथे व्यावसायिकाच्या घरी नोकराकडून चोरी

६ लाखांचे गोल्ड कॉईन चोरी केल्याचा आरोप आहे
विलेपार्ले येथे व्यावसायिकाच्या घरी नोकराकडून चोरी

मुंबई : विलेपार्ले येथे राहणाऱ्या एका वयोवृद्ध व्यावसायिकाच्या घरी नोकरानेच चोरी करून पलायन केले. अजयकुमार उपेंद्र यादव अये या नोकराचे नाव असून त्याने सुमारे ६ लाखांचे गोल्ड कॉईन चोरी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अजयकुमारविरुद्ध जुहू पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला असून त्याच्या अटकेसाठी एक पथक लवकरच त्याच्या बिहार येथील गावी जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विलेपार्ले येथे राहणाऱ्या अध्यात्म बंधू गुप्ता (७६) यांच्या सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत १२५ ग्रॅम वजनाचे सुमारे सहा लाखांचे गोल्ड कॉईन चोरीस गेले होते. अजयकुमार याचदरम्यान गावी निघून गेला, तो परत आलाच नाही. या चोरीमागे अजयकुमारचा सहभाग उघडकीस येताच त्यांनी जुहू पोलिसांत तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in