एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणारे प्रवासीच जास्त

नव्याचे नऊ दिवस सरल्यानंतर सद्य:स्थितीत मात्र बोटावर मोजण्याइतपत तिकीट तपासनीस एसी लोकलमध्ये दिसून येत आहेत.
एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणारे प्रवासीच जास्त

एसी लोकलमधून दिवसागणिक प्रवासीसंख्या वाढत आहे. तिकीटदरातील कपातीचा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या चांगलाच पचनी पडला असून, त्यानंतर एसी लोकलच्या तिकीट आणि पासविक्रीत वाढ होऊ लागली आहे; मात्र दुसऱ्या बाजूला ही गर्दी पासधारक आणि तिकीटधारक यांची नसून, सकाळी आणि रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची असल्याची बाब समोर येत आहे.

उपनगरीय रेल्वेमार्गावरील एसी लोकलमध्ये जवळपास ४०० हून अधिक तिकीट तपासनीस कार्यरत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले असताना नव्याचे नऊ दिवस सरल्यानंतर सद्य:स्थितीत मात्र बोटावर मोजण्याइतपत तिकीट तपासनीस एसी लोकलमध्ये दिसून येत आहेत. परिणामी, मोठ्या प्रमाणात विनातिकीट प्रवाशांचा शिरकाव होत असल्याने तिकीट आणि पासधारक प्रवाशांना मात्र गर्दी आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर काही प्रवाशांनी तिकीट तपासनिसांची कारवाई थंडावल्याने एसी लोकलमधील ही गर्दी वाढल्याचा आरोप केला आहे. मागील काही वर्षांमध्ये एसी लोकल मोठ्या प्रमाणात धावत आहेत. सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर सवलतीनंतर एसी लोकलला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in