पालिका कार्यालयात काम बंद सुरक्षेसाठी कायदा करावा

म्युनिसिपल मजदूर युनियनची मागणी
पालिका कार्यालयात काम बंद सुरक्षेसाठी कायदा करावा

मुंबई : पालिकेच्या एम. पूर्व विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंता अनिल जाधव यांच्यावर शाईफेक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी पालिकेच्या एम. पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच उपनगरातील विभाग कार्यालयातील अभियंत्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने पालिका अभियंत्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करावा, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

मुंबई काँग्रेसच्या वतीने एम. पूर्व वॉर्डावर शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. रस्त्यावरील कचरा, खड्ड्यांमुळे झालेली वाताहत, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीचे आजार, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा या आजारांना नियंत्रणात ठेवण्यात आलेले प्रशासनाला अपयश यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी पालिका अभियंता अनिल जाधव (५२) यांच्यावर संतप्त आंदोलकांनी शाई फेकली व त्यांना धमकावले. या प्रकरणी जाधव यांनी यूथ काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आरिफ सय्यद व त्याच्या इतर साथीदारांविरोधात देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संबंधितांना अटकदेखील करण्यात आली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ म्युनिसिपल मजदूर युनियन आणि म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने एम. वॉर्डवर मोर्चा काढण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in