वाहतूककोंडीतून मुक्तता होणार; दहिसर, मानखुर्द चेकनाक्यांवर पार्किंग हब उभारणार

मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत जकातनाके २०१७मध्ये बंद करण्यात आले.
वाहतूककोंडीतून मुक्तता होणार; दहिसर, मानखुर्द चेकनाक्यांवर पार्किंग हब उभारणार

ओस पडलेल्या दहिसर व मानखुर्द चेक नाक्यांवर लवकरच शॉपिंग सेंटर, हॉटेल, चार्जिंग स्टेशन, फूड प्लाझा अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी बंद पडलेल्या दहिसर व मानखुर्द चेक नाक्यांच्या जागेवर पार्किंग हब विकसीत करण्यात येणार असून देशभरातून येणाऱ्या पॅसेंजर गाड्यांना आता दहिसर व मानखुर्द चेकनाक्यांवर गाड्या पार्क करणे बंधनकारक होणार आहे. मात्र पॅसेंजरची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रो रेल्वे व बेस्ट बसेसची कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी पार्किंग हब विकसित करण्यासाठी १२०० कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दैनिक ‘नवशक्ति’शी बोलताना दिली.

मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत जकातनाके २०१७मध्ये बंद करण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत दहिसर व मानखुर्द जकात नाके ओस पडले आहेत. बंद असलेल्या दहिसर जकातनाक्याची जमीन ६ एकर असून ५ एकर जमिनीवर अद्यावत पार्किंग हब विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी आता देशभरातून येणाऱ्या पॅसेंजर गाड्यांना दहिसर व मानखुर्द चेकनाक्यांवरच रेड सिग्नल मिळणार आहे. या पॅसेंजर गाड्या या ठिकाणी हॉल्ट घेऊन पुन्हा परतीला जातील. मात्र देशभरातून येणाऱ्या पॅसेंजरची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट बस व मेट्रो रेल्वेशी कनेक्ट होईल असे नियोजन असल्याचे वेलरासू यांनी सांगितले.

दरम्यान, या दोन्ही ठिकाणी पार्किंग हब विकसीत करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्किंग हब मध्ये आणखी काय सुविधा उपलब्ध होऊ शकतील, याचा अभ्यास सल्लागार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

असा होणार फायदा

दहिसर जकातनाक्यावर सध्या २४६२८ चौरस मीटर जागा आहे. तर मानखुर्द जकात नाक्यावर २९७७४ चौरस मीटर जागा आहे. या दोन्ही ठिकाणी मोक्याच्या जागांचा सद्यस्थितीत पालिकेला कोणताही उपयोग होत नसताना पार्विंâग, बिझनेस हबमुळे महसूल, रोजगार आणि विकास असा तिहेरी फायदा होणार आहे. कुठल्या राज्यातून पॅसेंजर गाड्या येतात, एक पॅसेंजर गाडी किती वेळ थांबते, महाराष्ट्र राज्यबाहेरील किती गाड्या रोज मुंबईत येतात या सगळ्या गोष्टींचा सल्लागाराच्या माध्यमातून सर्व्हे सुरु आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in