बंडखोरांनचा हा क्षणिक विजय पण भविष्यातला पराभव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना सोडले, वर्षा बंगला सोडला; पण अद्याप शरद पवारांना नाही सोडले,
बंडखोरांनचा हा क्षणिक विजय पण भविष्यातला पराभव

भारतीय जनता पक्ष जसे सांगेल, तसे राज्यपाल नाचतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा राज्यपालांवरून विश्‍वास उडालेला आहे. आता न्यायालय तरी न्याय देईल, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. एकीकडे १६ आमदारांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत एकदम गुरुवारीच अधिवेशन घेण्यापेक्षा १० दिवस उशिरा घेतले असते, तर काय फरक पडला असता,” असा सवाल आमदार नितीन देशमुख यांनी उपस्थित केला आहे. “महाराष्ट्राबद्दल राज्यपालांचा प्रामाणिकपणा, त्यांची निष्ठा तमाम जनतेला दिसून आली. बंडखोरांना वाटत आहे की, ते जिंकले. अन् समजा जिंकलेही, तरीही हा विजय क्षणिक आहे. त्यांचा आजचा विजय हा भविष्यातील पराभव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना सोडले, वर्षा बंगला सोडला; पण अद्याप शरद पवारांना नाही सोडले, या गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याबाबत विचारले असता आमदार देशमुख म्हणाले, हा गुलाबराव पाटलांचा सूर नाही, तर त्यांच्या गळ्यातून भाजप बोलते आहे. गुलाबरावांवर मोठा दबाव आहे,” असे देशमुख म्हणाले. “गुवाहाटीवरून परत आलेले बंडखोर आमदार बहुमत चाचणीसाठी जेव्हा उद्या सभागृहात येतील, तेव्हा त्यांचे मत बदललेले असेल. सध्या ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत; पण महाराष्ट्र या संतांच्या भूमीत ते पाय ठेवतील, तेव्हा निश्‍चितपणे त्यांचे विचार बदललेले असतील आणि ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे झालेले दिसतील.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in