राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन

त्या धमकीच्या फोननंतरही शरद पवारांनी आपला दौरा कायम ठेवत सकाळी कुर्डुवाडी गाठले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन आला असून सोमवारी सकाळी कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये, अशी धमकी देण्यात आली होती; मात्र या फोननंतरसुद्धा शरद पवारांनी हा नियोजित दौरा पूर्ण केला.

दरम्यान, सकाळी कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून शरद पवार यांना देण्यात आली होती; मात्र त्या धमकीच्या फोननंतरही शरद पवारांनी आपला दौरा कायम ठेवत सकाळी कुर्डुवाडी गाठले. फोन करणारी व्यक्ती कोण आहे आणि ही धमकी त्याने का दिली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पवारांना धमकी दिल्याच्या वृत्ताबाबत अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.

कारण नसताना संजय राऊतांना भाजपने जेलमध्ये टाकले

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यांकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपचे नेतेमंडळी करत आहेत. त्यावर पवार म्हणाले की, “अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना काहीही कारण नसताना जेलमध्ये टाकण्यात आले. भाजपवाल्यांनी त्यांना जेलमध्ये टाकले आणि आता आम्हाला सांगतायेत की, आम्ही वाऱ्यावर सोडले. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे.”

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in