भांडणाला कंटाळून पत्नीनेच केली पतीची हत्या

रुबीनाविरुद्ध साकिनाका पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.
भांडणाला कंटाळून पत्नीनेच केली पतीची हत्या

सततच्या भांडणाला कंटाळून पतीची पत्नीनेच हत्या करून हत्येचा पुरावा नष्ट करून पलायन केल्याची धक्कादायक घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. नसीम खान असे या २३ वर्षांच्या पतीचे नाव असून, पळून गेलेल्या रुबीना खान हिचा पोलीस शोध घेत आहेत. रुबीनाविरुद्ध साकिनाका पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.

पाच वर्षांपूर्वी नसीमचा रुबीनासोबत विवाह झाला होता. तो टेलरिंगचे काम करीत होता. गेल्या सहा दिवसांपासून ते दोघेही साकिनाका येथील यादव नगर, सरवर चाळीत राहण्यासाठी आले होते. या दोघांमध्ये सतत क्षुल्लक कारणावरून भांडण होत होती. या भांडणानंतर दोन्ही कुटुंबीयांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते.

१४ जुलैला नसीमच्या वडिलांनी त्याला कॉल केला होता, यावेळी रुबीनाने तो झोपला असल्याचे सांगून फोन कट केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी ते त्याच्या घरी आले होते; मात्र बाहेरून लॉक असल्याने ते तेथून निघून गेले. दोन दिवसांपासून त्याच्या घरातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी ही माहिती साकिनाका पोलिसांना दिली. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांना नसीमचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in