तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

वांद्रे येथील ३९५ चौ.मी. शासकीय जमीन तिरुमला तिरुपती देवस्थानास वाहनतळ, माहिती केंद्र, कार्यालय आणि भक्तांसाठी आवश्यक इतर सोयी-सुविधा उभारण्यासाठी ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. केवळ एक रुपया वार्षिक नाममात्र दराने ही जमीन देण्यात येणार आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३९५ चौरस मीटर जमिनीवर पार्किंग, कार्यालय ; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे
तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३९५ चौरस मीटर जमिनीवर पार्किंग, कार्यालय ; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे
Published on

मुंबई : वांद्रे येथील ३९५ चौ.मी. शासकीय जमीन तिरुमला तिरुपती देवस्थानास वाहनतळ, माहिती केंद्र, कार्यालय आणि भक्तांसाठी आवश्यक इतर सोयी-सुविधा उभारण्यासाठी ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. केवळ एक रुपया वार्षिक नाममात्र दराने ही जमीन देण्यात येणार आहे.


वांद्रे येथील ही जमीन यापूर्वीच भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या ६४८ चौ.मी. जमिनीच्या समोर आहे. या नव्या भूखंडावर देवस्थान वाहनतळ, माहिती केंद्र, कार्यालय तसेच इतर सेवा-सुविधा उभारणार आहे. मात्र, जमिनीची मालकी महसूल विभागाकडेच राहणार असून ती केवळ मंजूर उद्देशासाठीच वापरावी लागणार आहे. देवस्थानास तीन वर्षांच्या आत बांधकाम पूर्ण करणे अनिवार्य आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देवस्थानाने बांधलेल्या इमारतीतील २,००० चौ.फूट जागा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर) यांच्यासाठी राखून ठेवावी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in