टूडे ग्लोबल डेव्हलपर्सचा ‘मिशन उडान’ उपक्रम

या योजनेमध्ये ज्या लोकांनी अनेक अडथळे पार करत अविश्वसनीय यश मिळवले आहे, त्यांना सन्मानित केले जाईल.
टूडे ग्लोबल डेव्हलपर्सचा ‘मिशन उडान’ उपक्रम

मुंबई : टूडे ग्लोबल डेव्हलपर्सने ‘मिशन उडान’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश हा टूडे ग्लोबल डेव्हलपर्सच्या ग्राहकांच्या मुलांची स्वप्ने व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्य करणे हा आहे. मिशन उडान अंतर्गत नुकतेच कंपनीने त्यांच्या ग्राहकांच्या मुलांची बोर्ड परीक्षेतील उत्कृष्ट कामगिरी साजरी करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. टूडे ग्लोबल डेव्हलपर्सचे सहव्यवस्थापकीय संचालक भावेश शहा म्हणाले,‘‘मिशन उडान हा आमच्यासाठी केवळ एक उपक्रम नाही तर हे आमचे ध्येय आहे. मिशन उडानमधून आमची तरुणांच्या विकासाबद्दलची बांधिलकी दिसून येते. त्यांना शिक्षणासाठी बळ देऊन आम्ही त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे बीज पेरत आहोत.’’ कंपनीने याच कार्यक्रमात ‘हीरोज ऑफ टुडे’ ही योजना सुद्धा सादर केली. या योजनेमध्ये ज्या लोकांनी अनेक अडथळे पार करत अविश्वसनीय यश मिळवले आहे, त्यांना सन्मानित केले जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in