मुंबईच्या प्रवेशद्वारावर २०२६ नंतरच टोलमुक्ती

माहिती अधिकारातून बाब समोर
मुंबईच्या प्रवेशद्वारावर २०२६ नंतरच टोलमुक्ती

मुंबई : मुंबईतील ३१ फ्लायओवर पूलावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) टोल वसूल करण्यासाठी मुंबईच्या पाच प्रवेशनाक्याचे कंत्राट अवघ्या २२४२.३५ कोटीला एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमएसआरडीसीने दिली आहे. त्यामुळे आणखी तीन वर्षे टोल वसूल करण्याचा अधिकार दिल्याने २०२६ नंतरच मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलमुक्त होतील.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईच्या पाच प्रवेश नाक्यांवर वसूल केल्या जाणाऱ्या टोलबाबत वर्ष २०१६ मध्ये माहिती मागितली होती. एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०१०-११ पूर्वी एमएसआरडीसी स्वत: टोल वसूल करत होती. त्यानंतर एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला १९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत टोल वसुलीचे कंत्राट दिले असून त्याबदल्यात एमएसआरडीसीने २२५२.३५ कोट रक्कमी घेतली आहे.

मुंबईतील ३१ उड्डाणपूलांसाठी एमएसआरडीसीने १०५८ कोटी ३४ लाख ६६ हजार ८८५ रुपये खर्च केले असून त्याचा खर्च मुंबईतील ५ प्रवेश नाक्यावर टोल नाका बनवून वसूल केला जात आहे. वेस्टर्न कॉरिडोरवर २२८ कोटी ७९ लाख ९५ हजार ९१६ रुपये खर्च झाले असून त्यात आरे गोरेगाव, दत्तपाडा, जीएमएलआर, जयकोच, कालीना- वाकोला, माहिम, नॅशनल पार्क आणि रानी सती मार्ग या आठ उड्डाणपूलांचा समावेश आहे. ईस्टर्न फ्लाईओवरअंतर्गत २४१ कोटी ४० लाख ९९ हजार ४५० रुपये हे छेडानगर, एजीएलआर, सीएसटी- कुर्ला, जीएमएलआर, गोल्डन डाइज, जेवीएलआर, नितिन कास्टिंग अँड कैडबरी, सायन आणि विक्रोळी फ्लायओवरच्या बांधकामावर खर्च केले आहेत.

मुंबई शहरातील जेजे हॉस्पिटल, एन एम जोशी आणि सेनापती बापट मार्ग या फ्लायओवरच्या बांधकामावर १४४ कोटी ८१ लाख ५० हजार ८६४ रुपये एमएसआरडीसीने खर्च केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in