घरफोडीच्या दोन गुन्ह्यांत अल्पवयीन मुलासह त्रिकुटास अटक

आरोपींकडून चोरीचा बहुतांश मुद्देमाल हस्तगत करण्यात यश
घरफोडीच्या दोन गुन्ह्यांत अल्पवयीन मुलासह त्रिकुटास अटक

मुंबई : घरफोडीच्या दोन गुन्ह्यांत एका अल्पवयीन मुलासह त्रिकुटाला डी. एन नगर आणि वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांकडून पोलिसांनी चोरीचा बहुतांश मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस कोठडीनंतर दोघांन न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सतीश मनोहर अहिरे हे वडाळा परिसरात राहतात. २४ जुलैच्या मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरी चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिन्यांसह इतर मुद्देमाल पळविला होता. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या जुनैद किफात कुरेशीसह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे दागिने, चांदीचे नाणी आदी मुद्देमाल जप्त केला आहे. दुसर्‍या घटनेत डी. एन नगर पोलिसांनी यासीन हनीफ शेख ऊर्फ कंट्री या आरोपीस अटक केली. १४ जुलैला त्याने अंधेरीतील गिल्बर्ट हिल रोडवरील एका फ्लॅटमधून कॅश चोरी होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी यासीनला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला घरफोडीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in