
मुंबई : गोरेगाव येथे रॉबरीसाठी आलेल्या दोन गुन्हेगारांना बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. संदीप नंदू मोहिते आणि शाहरूख यासीन शेख अशी दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील संदीप हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध १४हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे तर त्याच्यावर दोन वेळा तडीपारची कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी रात्री काही आरोपी गणेशघाट परिसरात रॉबरीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून संदीप मोहिते आणि शाहरूख शेख या दोघांना अटक केली. चौकशीत ते दोघेही तिथे रॉबरीच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली.