गाईच्या दुधामुळे दोन महिन्यांचे बाळ व्हेंटिलेटरवर; मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

गाईच्या दुधामुळे दोन महिन्यांचे बाळ व्हेंटिलेटरवर; मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

स्तनपानात मातांना काही अडचण येत असतील तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

भाईंदर : गाईच्या दुधाच्या सेवनामुळे संसर्ग आणि ॲॅसिडोसिसने ग्रस्त २ महिन्यांच्या बाळावर मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. या बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. बाळाचे आरोग्य धोक्यात आले असून त्याला डायलिसिस करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत वेळीच उपचार केल्याने बाळाला नवे आयुष्य मिळाले आहे.

डॉ. अंकित गुप्ता, बालरोगतज्ज्ञ (क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट) वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने बाळावर यशस्वी उपचार केले. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या पालकांना खूप आनंद झाला, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. काही दिवसांतच या बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दिवसेंदिवस बाळाची तब्येत ढासळत असल्याने पालकांनी त्याला घेऊन वोक्हार्ट रुग्णालयाकडे धाव घेतली. आईचे दूध हे बाळांसाठी अमृतासमान असते. पहिल्या सहा महिन्यांपर्यंत बाळाला स्तनपान देण्याचा सल्ला दिला जातो. स्तनपानात मातांना काही अडचण येत असतील तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्रतिक्रिया

या बालकाची ऑक्सिजन पातळी ८० पर्यंत पोहोचली होती. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. बाहेरील दूध लहान बाळांना योग्य नसते. कारण त्यांची पचनक्रिया तितकी मजबूत नसते. अशा दुधामुळे बाळाला बॅक्टेरियासंबंधित संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अमोनिया पातळी आणि गंभीर ॲॅसिडोसिसमध्ये वाढ होते. त्याची पीएच पातळी ६.९ इतकी मोजली गेली, जी ७.४ च्या सामान्य मर्यादेपेक्षा कमी आहे.

- डॉ. अंकित गुप्ता, बालरोग तज्ज्ञ (क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट), वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड

... तर त्याचा जीवही गेला असता,

त्याच्या शरीरातील अॅसिड्स कमी करण्यासाठी औषधोपचार देण्यात आले, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याच्या चयापचयातील अमोनियाची पातळी ७०० हून अधिक आहे. त्यामुळे उच्च अमोनियाचा मेंदूवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. त्यांना आठवडाभर डायलिसिस करावे लागले. मेथेमोग्लोबिनची पातळी ३० पर्यंत वाढली होती, जी साधारणपणे १ पेक्षा कमी असावी. त्यामुळे बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. या बाळावर महिनाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. बाळाच्या प्रकृतीत सुधारणा पाहून त्याला आता घरी सोडण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बाळावर वेळीच उपचार झाले नसते, तर त्याचा जीवही गेला असता.

आईचे दूधच महत्त्वाचे

मुलाची आई आरती (नाव बदलले आहे) हिने सांगितले की, आम्ही मुलाला गाईचे दूध दिले होते. या दुधाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो याबाबत आम्हाला माहिती नव्हती, मात्र वोक्हार्ट रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करत आज आमच्या बाळाचे प्राण वाचवले. माझ्या बाळाला नवीन आयुष्य बहाल केल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानते. आम्ही सर्व पालकांना त्यांच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करतो आणि स्तनपान करण्यास टाळू नये, असा सल्ला देतो. लहान मुलांना बाहेरचे दूध देऊ नका.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in