दोन घटनेत इमारतीवरुन पडून दोन कामगारांचा मृत्यू

याप्रकरणी खार आणि बोरिवली पोलिसांनी दोन स्वतंत्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दोन घटनेत इमारतीवरुन पडून दोन कामगारांचा मृत्यू

मुंबई : शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत इमारतीवरुन पडून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना खार आणि बोरिवली परिसरात घडली. मृतांमध्ये मनोज कल्लू शर्मा आणि हबीबुल्लाह किस्मतुल्लाह कुरेशी यांचा समावेश आहे. याप्रकरणी खार आणि बोरिवली पोलिसांनी दोन स्वतंत्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मनोज हा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून, बोरिवलीतील कोरा केंद्राजवळील ओम श्री टॉवर या इमारतीच्या बांधकाम साईटवर कामावर होता. गुरुवारी दुपारी काम करताना तो सोळाव्या मजल्यावरुन तिसऱ्या मजल्यावरील पॅसेजमध्ये पडला होता. या इमारतीला जाळी लावण्यात आली होती; मात्र इमारतीची भिंत आणि जाळीमध्ये प्रचंड अंतर असल्याने तो खाली पडला होता. त्याला बोरिवलीतील फोनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान सायंकाळी पावणेपाच वाजता त्याचा मृत्यू झाला. दुसर्‍या घटनेत इमारतीचे निष्कासन करताना दुसऱ्या मजल्यावरुन पडून हबीबुल्लाह किस्मतुल्लाह कुरेशी या २८ वर्षांच्या कामगार तरुणाचा मृत्यू झाला. मृत हबीबुल्लाह हा गोवंडीतील बैगनवाडी, कमला रमणनगर परिसरात राहत होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in