उदय सामंतदेखील एकनाथ शिंदे गटात सामील

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे
 उदय सामंतदेखील एकनाथ शिंदे गटात सामील

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतदेखील आता एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेत आता विधानसभेतून निवडून आलेले केवळ आदित्‍य ठाकरे हेच एकमेव मंत्री उरले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता एकूण नऊ मंत्री झाले आहेत. शिवसेना बंडखोर मंत्र्यांवर कारवाई करणार, असे बोलले जाते; पण आता नेमकी काय कारवाई होणार, हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उदय सामंत तर शनिवारी शिवसेनेच्या राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीलाही उपस्‍थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केल्‍यानंतरही उदय सामंत यांनी गुवाहाटीचा रस्‍ता धरला. रविवारी सकाळपासूनच उदय सामंत नॉट रिचेबल होते, तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. ते सुरतमार्गे गुवाहाटीला विशेष विमानाने संध्याकाळी पोहोचले.

बंडखोर मंत्र्यांची संख्या नऊ

उदय सामंत यांच्या जाण्याने एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या मंत्र्यांची संख्या आता नऊ झाली आहे. विधानसभेतून निवडून आलेले आता आदित्‍य ठाकरे हे एकमेव मंत्री शिवसेनेत उरले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुभाष देसाई आणि अनिल परब हे विधानपरिषदेतून निवडून आले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in