कुर्लातील अनधिकृत बांधकाम आता जमीनदोस्त होणार, पालिकेचा निर्णय

कुर्ला पूर्व एसटी बस आगाराजवळील जिल्हाधिकाऱ्यांच्या जमीनीवरील नाईक नगर सोसायटीतील इमारत कोसळली
कुर्लातील अनधिकृत बांधकाम आता जमीनदोस्त होणार, पालिकेचा निर्णय

कुर्ला पूर्व व पश्चिम भागात अनधिकृत बांधकाम आता जमीनदोस्त करण्याचा निर्णय पालिकेच्या एल वॉर्डने घेतला आहे. यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली असून पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशी माहिती एल वॉर्डचे सहायक आयुक्त महादेव शिंदे यांनी दिली.

कुर्ला पूर्व एसटी बस आगाराजवळील जिल्हाधिकाऱ्यांच्या जमीनीवरील नाईक नगर सोसायटीतील इमारत कोसळली आणि १९ जणांचा जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर कुर्ल्यातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याचा अँक्शन प्लॅन तयार केला आहे. कुर्ला पूर्व व पश्चिम भागातील बैल बाजार, सुंदर बाग, कसाई वाडा आदी ठिकाणी अनधिकृत बांधकाम असून पावसाळ्यात या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

नाईक नगर सोसायटीच्या रहिवाशांना नोटीस

कुर्ला पूर्व एसटी बस आगाराजवळील नाईक नगर सोसायटीत चार इमारती असून एक इमारत सोमवारी रात्री कोसळली. या सोसायटीत चार इमारती असून एक इमारत कोसळली असून एक इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. तर उर्वरित दोन इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली असून इमारत पाडण्यासाठी रहिवाशांनी पैसे खर्च करावे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in