स्थानके चकाचक ठेवण्यासाठी व्हॅक्यूम कचरा संग्राहक विकसित, स्वच्छतेसाठी मध्य रेल्वेचा नवा प्रयोग !

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वेरूळ, स्थानके आणि रेल्वे परिसर स्वच्छ करण्यासाठी नवा प्रयोग केला आहे.
स्थानके चकाचक ठेवण्यासाठी व्हॅक्यूम कचरा संग्राहक विकसित, स्वच्छतेसाठी मध्य रेल्वेचा नवा प्रयोग !

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वेरूळ, स्थानके आणि रेल्वे परिसर स्वच्छ करण्यासाठी नवा प्रयोग केला आहे. मेकॅनिकल शाखेने इन हाऊस बॅटरी ऑपरेटेड पोर्टेबल बॅकपॅक प्रकारचा व्हॅक्यूम कचरा संग्राहक विकसित केला आहे. या मशीनच्या माध्यमातून रेल्वे स्थानक आणि परिसर स्वच्छ करण्याचा वेळ वाचणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने स्वच्छतेसाठी एक अभिनव पाऊल उचललेले आहे. बॅटरी ऑपरेटेड पोर्टेबल बॅकपॅक प्रकारचे व्हॅक्यूम कचरा कुंडी संग्राहक तयार करण्यात आले आहे. याचा वापर रेल्वे रूळ, स्थानके आणि रेल्वे परिसर स्वच्छ करण्यासाठी होणार आहे. कचरा गोळा करण्यासाठी बास्केटला जोडलेल्यालवचिक पीव्हीसी पाईपसह २० व्होल्ट डीसी पॉवर सप्लायवर चालणारा हा रिचार्ज करण्यायोग्य बॅकपॅक आहे. याचे वजन ७ किलो असून ते वाहून नेण्यास हलके आहे.

५० मीटर अंतरापर्यंत कचरा गोळा करण्यासाठी माशीशिवाय २० मिनिटे लागतात. तर हे मशीन १० मिनिटांत काम करते. कागद, काच, प्लास्टिक, टेट्रापॅक, कापड, अॅल्युमिनियम फॉइल, बाटल्या इत्यादी ५० लिटर कचरा एकाच वेळी गोळा करण्याची क्षमता यात आहे. तसेच प्रभावी आणि पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी बायो-डिग्रेडेबल आणि नॉन बायो-डिग्रेडेबल वस्तू स्वतंत्रपणे गोळा केल्या जातात. मुंबई विभागात सध्या २ व्हॅक्यूम क्लीनर संच आहेत. हे संच इन- हाऊस विकसित आणि उत्पादित केले गेले आहेत. संपूर्ण विभागात या संचांचा वापर करण्यासाठी आणखी ११६ संच खरेदी करण्याची रेल्वेची योजना आहे. त्यासाठी प्रत्येक सेटची अंदाजे किंमत सुमारे २५ हजार रुपये आहे.

मशीनचे फायदे

■ कोठेही नेण्यास सोपे, वापरण्यास सोपे

■ रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीवर चालते

■ एक स्विच ऑपरेशन

धुळीचे कण पसरत नाहीत

■ जलद आणि कार्यक्षम

■ वेळ आणि पैसा वाचवते

logo
marathi.freepressjournal.in