वर्षा राऊत यांची ईडीकडून १० तास चौकशी

‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संजय राऊत यांच्या चौकशी अनेक बाबी उघड झाल्या आहेत
वर्षा राऊत यांची ईडीकडून १० तास चौकशी

अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची शनिवारी ‘ईडी’ने पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी १० तास चौकशी केली. राऊत यांना ३१ जुलै रोजी ‘ईडी’ने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स पाठवले होते.वर्षा राऊत सकाळी ११ वाजता ईडीच्या बलार्ड इस्टेट येथील कार्यालयात चौकशीसाठी पोहचल्या. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्या कार्यालयातून बाहेर पडल्या. त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.

‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संजय राऊत यांच्या चौकशी अनेक बाबी उघड झाल्या आहेत. त्यामुळे वर्षा राऊत यांची चौकशी होणे गरजेचे होते. स्वतंत्र चौकशी केल्याने आरोपीने पैशाचा कसा अपहार केला यावर प्रकाश पडू शकेल.

ईडीच्या म्हणण्यानुसार, वर्षा यांच्या बँक खात्यात १.०८ कोटी रुपये जमा झाले. याबाबत संजय राऊत यांना चौकशी याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.

पीएमसी बँकेशी संबंधित प्रश्न वर्षा यांना ‘ईडी’ने विचारले. प्रवीण राऊत याने वर्षा यांना पैसे हस्तांतरित केले. या प्रकरणात त्याचेही नाव आरोपी म्हणून आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in