प्लास्टिक विरोधातील कारवाईला वेग; आतापर्यंत २४ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री खरेदी करणाऱ्या विरोधात कारवाईला सुरुवात केली
प्लास्टिक विरोधातील कारवाईला वेग; आतापर्यंत २४ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल

जुलै महिन्यापासून सुरू केलेल्या प्रतिबंधित प्लास्टिक कारवाईला वेग आला आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत ४९४ प्रकरणात तब्बल २,५५१ किलो जप्त करण्यात आले आहे. या जप्तीच्या कारवाईतून २४ लाख ७० हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली. दरम्यान, मुंबई प्लास्टिकमुक्त करण्यासाठी यापुढे धडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिल्याचे कबरे यांनी सांगितले.

२६ जुलै २००५मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री खरेदी करणाऱ्या विरोधात कारवाईला सुरुवात केली होती. मात्र मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री व खरेदी करणाऱ्यांवरील कारवाई थंडावली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने १ जुलै २०२२ पासून पुन्हा एकदा कारवाई बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in