राज्यात पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत
राज्यात पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

दडून बसलेल्या वरुणराजाने जूनअखेरीस हजेरी लावली असून पावसाची जोरदार बँटिंग सध्या सुरू आहे. मात्र, रविवारी पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिक घामाच्या धारांनी भिजले आहेत. असे असले तरी राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. २६ जूनपासून पावसाला सुरुवात होईल अशी माहिती मिळत होती. त्याप्रमाणे काही ठिकाणी पावसाने सुरुवात केली. मात्र कोकणचा काही प्रदेश वगळता राज्यातील इतर भागात पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे.जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. जून महिन्यातील पावसाचा संभाव्य अंदाजही वर्तवण्यात आला होता. यामध्ये सामान्य किंवा सामान्य पाऊस वायव्य आणि मध्य भारतात पडेल तसेच असाच पाऊस उत्तर द्वीपकल्प, पूर्वेचा काही भाग आणि ईशान्येकडील काही भागांमध्येही होण्याची शक्यता होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊसमान चांगले असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानुसार, मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरु आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in