रेल्वे स्थानकांवरील वॉटर व्हेंडींग मशिन्स बंद रेल नीर पाण्याच्या बंदीस्त बाटल्यांचा देखील तुटवडा

रेल्वे स्थानकांवरील वॉटर व्हेंडींग मशिन्स बंद रेल नीर पाण्याच्या बंदीस्त बाटल्यांचा देखील तुटवडा

ऐन उन्हाळ्यात रेल्वे स्थानकांवरील वॉटर व्हेंडींग मशिन्स बंद असताना दुसऱ्या बाजूला स्थानकांवर असणाऱ्या रेल नीर पाण्याच्या बंदीस्त बाटल्यांचा देखील तुटवडा दिसून येत आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील बहुतांश स्थानकात ही परिस्थिती असताना मुंबईबाहेर भुसावळ, नागपूर, नाशिक या मार्गावरील विविध स्थानकात देखील हीच भीषण परिस्थिती असल्याने प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी नळावर रांगा लावाव्या लागत आहेत अथवा लांब पल्ल्यांच्या गाड्या सुटेपर्यंत पाण्याच्या शोधात वणवण फिरावे लागत आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोईसाठी वॉटर व्हेंडिंग मशिन्स, रेल नीर पाण्याच्या बंदीस्त बाटल्या, जनजल योजना अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत; मात्र दुर्दैवाने यंदाच्या उन्हाळ्यात प्रवाशांना यापैकी कोणत्याच सुविधेचा लाभ घेता येत नसून पिण्याच्या पाण्यासाठी स्थानकावरील नळावर रांगा लावाव्या लागत आहेत. मागील २० दिवसांपासून हे प्रमाण वाढले असून मध्य रेल्वेच्या कळवा ते कसारा, इगतपुरी, कर्जत ते लोणावळा विभागातील स्थानकांवर रास्त दरात मिळणाऱ्या रेल नीर पाण्याच्या बंदिस्त बाटल्यांचा तुटवडा जाणवत आहे. याशिवाय नागपूर, वर्धा, नाशिक, भुसावळ या स्थानकांवर देखील ही परिस्थिती असल्याचे प्रवाशांकडून संगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in