बाळासाहेब नेमके कोण, थोरात की विखे पाटील?किशोरी पेडणेकर यांनी उडवली शिंदे गटाची खिल्ली

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देताना मशाल हे चिन्ह दिले आहे.
बाळासाहेब नेमके कोण, थोरात की विखे पाटील?किशोरी पेडणेकर यांनी उडवली शिंदे गटाची खिल्ली

निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे. या नावावरून ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खिल्ली उडवली आहे. बाळासाहेबांची शिवसेना या नावांमधील बाळासाहेब नेमके कोण? थोरात, विखे पाटील की शिर्के, असा प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडून मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यानंतर त्यांनी शिवसेना तसेच शिवसेनेचे पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरती हक्क सांगितला होता. याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देताना मशाल हे चिन्ह दिले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले आहे, या नावावरून किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे. बाळासाहेबांची शिवसेना या नावात बाळासाहेब कोण?, बाळासाहेब थोरात का?, विखे पाटलांची का?, शिर्केंची? असे प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. असे बाळासाहेब अनेक आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे एकच, त्यात ठाकरे येणं महत्वाचं होते, असे पेडणेकर म्हणाल्या. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला मंगळवारी किशोरी यांच्यासह शिवसैनिकांनी भेट देत अभिवादन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in