मुंबईची पुन्हा तुंबई होणार ?

मुंबईची पुन्हा तुंबई होणार ?

मुंबईत पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता असते, अशा जागांची पाहणी करून उपाययोजनांवर भर दिला; मात्र अजूनही यातील ६६ पूर येण्याची शक्यता असलेले स्पॉट कायम असून, त्यातील ३३ स्पॉट हे खासगी किंवा इतर एजन्सीच्या जागेवरील आहेत.

दर वर्षीच्या तुलनेत यंदा पालिकेने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असले, तरी महानगरपालिकेने २८२ पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जागांवर उपाययोजना केल्या आहेत. यंदाच्या पावसाळ्याच्या आधी १०४ फ्लडिंग स्पॉट पालिकेने विशेष काम केले. त्यातील शहर भागात २५, पूर्व उपनगरात ११ व पश्चिम उपनगरातील ६८ फ्लडिंग पॉइंट्सचा समावेश होता. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी त्यातील ३० फ्लडिंग स्पॉट पालिकेने हाताळले आहेत. १०४ पैकी ३३ फ्लडिंग स्पॉट अद्याप बाकी असून, त्यावर उपाययोजना करणे बाकी आहे. २०२३च्या पावसाळ्यापूर्वी त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यात शहरातील १९, पूर्व उपनगरमधील एक व पश्चिम उपनगरातील १३ स्पॉट्सचा समावेश आहे.

मुंबई क्षेत्रात अद्याप ३३ पाणी तुंबण्याच्या जागा बाकी असून, त्यातील आठ जागा अशा आहेत, जिथे पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता आहे. त्यात शहर चार आणि पश्चिम उपनगर येथील चार स्पॉटचा समावेश आहे. पूर्व उपनगरात एकही फ्लडिंग स्पॉट बाकी नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तर खासगी क्षेत्र किंवा इतर प्राधिकरणाच्या अखत्यारित येणारे एकूण ३३ फ्लडिंग स्पॉट असून शहरात एक, पूर्व उपनगरमध्ये पाच आणि पश्चिम उपनगरात २७ स्पॉट आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in