बोगस व्हिसाप्रकरणी महिलेस विमानतळावर अटक

आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच तिला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
बोगस व्हिसाप्रकरणी महिलेस विमानतळावर अटक

मुंबई : बोगस व्हिसाच्या मदतीने नेदरलँडला जाणाऱ्या रमनदिप कौर गुरुपित सिंग या पंजाबच्या एका महिलेस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी अटक केली. उज्जवल भविष्यासाठी विदेशात नोकरी करून तिला तिथेच स्थायिक व्हायचे होते; मात्र तिच्या अटकेने तिचे विदेशात स्थायिक होण्याची योजना फसली गेली आहे. व्हिसासाठी तिने एका एजंटला बारा लाख रुपये दिले होते, त्यामुळे या एजंटचा आता पोलिसाकडून शोध सुरु आहे. १४ जूनला रमनदिप ही नेदरलँडला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिला नेदरलँडला पाठविण्याची परवानगी देण्यात आली होती; मात्र ऍमस्टारडम विमानतळावर तिला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्याकडे असलेला व्हिसा बोगस होता. त्यामुळे तिची तेथील पोलिसांकडून चौकशी सुरू होती. त्यानंतर तिला बुधवारी रात्री उशिरा पुन्हा भारतात पाठविण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच तिला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in