भुसावळ मंडळाच्या प्रबंधकपदी महिला अधिकारी

भुसावळ विभागामध्ये पहिल्यांदा महिला अधिकारी म्हणून या पदावर नेमणूक झाली आहे
भुसावळ मंडळाच्या प्रबंधकपदी महिला अधिकारी

मुंबई : इति पांडे या भारतीय रेल्वे वाहतूक सेवा १९९८ बॅचचे अधिकारी असून, त्यांनी भुसावल मंडल रेल प्रबंधक म्हणून शुक्रवारी पदभार स्वीकारला आहे. मध्य रेल्वेची नॉन-फेअर कमाई आणि तिकीट तपासणी कमाई वाढविण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. २०२२ - २३ मध्ये रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेला नॉन-फेअर कमाईसाठी दिलेले लक्ष्य ८२ कोटी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वे ने ८७ कोटींची कमाई केली आहे. २०२२ - २३ मध्ये रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेला तिकीट तपासणी कमाईसाठी दिलेले लक्ष्य २३५.३० कोटी होते. आणि त्यांच्या उत्तम नियोजनामुळे मध्य रेल्वेने ३०३.९१ कोटींची कमाई केली. तर २०२२ - २२ मध्ये ४६.९५ लाख विना तिकीट प्रवाशांना दंड करण्यात आला. तिकीट तपासणी कमाईच्या बाबतीत भारतीय रेल्वेच्या सर्व १६ झोनमध्ये मध्य रेल्वे प्रथम क्रमांकावर आहे. वाणिज्य विभागा व्यतिरिक्त त्यांना संरशा विभाग आणि सतर्कता विभागात काम करण्याचा अनुभव आहे. भुसावळ विभागामध्ये पहिल्यांदा महिला अधिकारी म्हणून या पदावर नेमणूक झाली आहे. त्यांनी गत महिन्यात दक्षिण आफ्रिकेत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन ८८ कि.मी अंतर ११ तास ४७ मिनिटात पार करून जिंकली हे विशेष अशा महिला अधिकारी भारतीय रेल्वेमध्ये एकमेव स्पोर्ट्स अधिकारी भुसावळ विभागाला लाभले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in