दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणार १२ चित्ते; वायूसेनेच्या विशेष विमानाने होणार दाखल

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली माहिती; ६ महिन्यांपूर्वी नामिबियामधून ८ चित्ते भारतात आणले होते
दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणार १२ चित्ते; वायूसेनेच्या विशेष विमानाने होणार दाखल

६ महिन्यांपूर्वी नामिबियातून ८ चित्ते भारतात आणले होते. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात सोडण्यात आले होते. त्यानंतर आता भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणले जाणार आहेत. वायुसेनेच्या विशेष विमानांमधून चित्त्याची दुसरी तुकडी भारतात दाखल होणार आहे. त्यानंतर त्यांना कुनो अभयारण्यात सोडण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.

केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या चित्त्यांच्या दुसऱ्या तुकडीमध्ये ७ नर आणि ५ मादी चित्त्यांचा समावेश असणार आहे. निवडलेले चित्त्यांमध्ये २ नर आणि १ मादी ही क्वाझुलु नताल येथील फिंडा गेम रिझर्व्हमधून तर लिम्पोपो प्रांतातील रुईबर्ग गेम रिझर्व्हमधून ५ नर आणि ४ मादी आणण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in